दिल्ली, पी. रामदास प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राजकीय पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. सोबतच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसनं आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. काँग्रेसचा हा जाहीरनामा GYAN ‘ग्यान’ या संकल्पनेवर आधारीत आहे. जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे यूथ, ए म्हणजे अन्नदाता तर एन म्हणजे नारी. देशातील या घटकांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.