नाशिक, लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुतीकडून महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अजूनही काही जागांचा तिढा न सुटल्यानं तीथे अद्याप उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी आहे. तिढा न सुटलेल्या जागांमध्ये नाशिकचा देखील समावेश होतो. महायुतीकडून अद्याप नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आज नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.