Arun Gawli : मोठी बातमी! डॉन अरुण गवळी येणार तुरुंगातून बाहेर; ..म्हणून शिक्षेच्या मुदतीपूर्वीच होणार सुटकानागपूर, उदय तिमांडे, प्रतिनिधी : नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डॉन अरुण गवळीची शिक्षेच्या मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळी यानं शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता डॉन अरुण गवळीची शिक्षेच्या मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार आहे. अरुण गवळी हा सध्या नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षेतून सूट मिळणार असल्यानं अरुण गवळी याला मोठा दिलासा मिळाला आहे.