Shani Pradosh Vrat 2024: या वर्षातील शेवटचं प्रदोष व्रत 6 एप्रिल रोजी शनिवारी आहे. शनिवारी असल्यानं या प्रदोषाला विशेष महत्त्व आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी लोक उपवास करून शंकराची विधिवत पूजा करतात. पूजा करताना शनि प्रदोष व्रताची कथा ऐकावी. भगवान शंकराच्या आशीर्वादाने पुत्र जन्माला येतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शनि प्रदोष व्रताची पूजा नेहमी संध्याकाळच्या वेळी केली जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी प्रदोष व्रताची पूजा संध्याकाळी का केली जाते? पूजेची वेळ आणि पद्धत याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.